ऑस्ट्रेलियाच्या बाजारात चिमुकल्या कोळ्याची दहशत. त्याचा एक चावा ठरतो आहे प्राणघातक

एका छोट्याशा ब्राझीलच्या कोळ्याने ऑस्ट्रेलिअन बाजारात दाणादाण उडवली आहे. हा कोळी केळ्याच्या बॉक्समध्ये सापडल्याने त्याचे नाव बनाना स्पायडर पडले आहे. मुळचा ब्राझिलिअन कोळी आकाराने एवढासा असला तरी त्याचा चावा अतिशय विषारी असतो. याच्या चाव्यामुळे अत्यंत वेदना, नजर अंधुक होणे, हृदयाचे ठोके वाढणे, हायपोथर्मिया आणि बहुधा या सर्वांतून मृत्यूही संभवतो. यामुळे कोळ्याला पकडण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. पण त्यात त्यांना यश न आल्याने सुपर मार्केटच बंद करण्यात आले.