दिवसा रेकी, रात्री चोऱया करणाऱया स्पायडरमॅनला अटक

स्पायडरमॅन स्टाईलने इमारतीत चढून घरपह्डय़ा करणाऱया चोरटय़ाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. हमीद शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार या एका खासगी विमान पंपनीत पूर्वी हवाई सुंदरी म्हणून काम करत होत्या. जुलै महिन्यात त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तेव्हा हमीद हा त्याच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या घरातून परदेशी चलन, दागिने, आयपह्न, घडय़ाळ असा 7 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. रात्री उशिरा त्या घरी आल्या. तेव्हा त्यांना घरात घरपह्डी झाल्याचे लक्षात आले. त्याने याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विजय आचरेकर आणि पथकाने तपास सुरू केला.

तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन. पोलिसांनी हमीदला अटक केली.  हमीद हा मूळचा आझमगडचा रहिवाशी आहे. तो ग्रीन नसलेल्या स्लायडिंगच्या खिडक्या असलेली घरे टार्गेट करायचा. दिवसा रेकी तर रात्री घरपह्डी करायचा.