‘विक्की वेलिंगकर’मध्ये स्पृहाचा हटके लूक 

529

‘विक्की  वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशीचा दमदार अभिनय बघायला मिळणार आहे. ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामध्ये स्पृहाचा वेगळा लूक दिसत आहे. सौरभ वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि ‘मास्क मॅन’ यांचा वेगळा लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो घडय़ाळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका सर्व आव्हानांकर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते तिची ही कथा आहे. त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत असून ‘ती विक्कीला वाचकू शकेल?’ या आशयाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी. निशाणदार यांची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या