एसआरए वेगाने मार्गी लावण्यासाठी स्ट्रेस फंड, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे संकटात आलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती देण्यासाठी स्ट्रेस फंड उभारण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. त्याशिवाय कोणत्याही एसआरए प्रकल्पाला यापुढे स्थगिती दिली जाणार नाही. पात्रतेच्या दाखल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व महापालिकाच्या तीन यंत्रणाऐवजी केवळ उपजिल्हाधिकाऱयांमार्फत दाखला, आणि प्रकल्पाच्या मंजुरीचा वेळ कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपली चर्चा झाली असून आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचा फायदा मुंबईतील विकासकांना आणि झोपडपट्टीतील रहिवाशांनाही होईल.

मासिक भाडे निश्चित
एसआरए योजनेतील झोपडपट्टीधारकांचे मासिक भाडे निश्चित केले आहे. त्यानुसार मुंबई शहराच्या हद्दीत (वांद्रे) 12 हजार रु. वांद्रे, अंधेरी ते घाटकोपरपर्यंत 12 हजार रु., घाटकोपर व अंधेरीच्या पुढे 8 हजार रु.

तीन टेबलांवर फाईल फिरणार
प्रकल्पाच्या अभियांत्रिकी योजनेच्या मंजुरीच्या फाईलची तपासणी सहाऐवजी तीन टप्प्यांमध्येच होईल. त्यामुळे मंजुरीचा कालावधी कमी.
पात्र-अपात्र दाखला उपजिल्हाधिकाऱ्याकडून पात्र-अपात्रतेचा दाखला उपजिल्हाधिकारी, महापालिका व म्हाडाच्या तब्बल 44 सक्षम प्राधिकरणांकडून दिला जात होता. पण आता तीन यंत्रणांऐवजी एका उपजिल्हाधिकाऱयाकडून मिळणार.

आता करारनामे सीसीपूर्वी
51 टक्के झोपडपट्टीधारकांचे करारनामे एलओआय (आशयपत्र)पूर्वी सादर करण्याची अट शिथिल. आता सीसीपूर्वी (भोगवटा प्रमाणपत्र) करारनामे सादर करण्याचा प्रस्ताव
विकासकांना विविध शुल्क भरण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी
बँक गॅरेंटीचा दर सरसकट सर्व प्रकल्पांसाठी बांधकाम खर्चाच्या दोन टक्के
पात्र-अपात्रतेचे अपील दोन ऐवजी एकाच टप्प्यात निकाली निघणार
प्रत्येक एसआरए योजनेत सार्वजनिक आरोग्य केंद्र बंधनकारक