जालना- SRPF जवानाची गोळी झाडून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या शस्त्रागारामध्ये आज 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. सचिन गोविंद भदरगे (41) असे या जवानाचे नाव असून, ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. शास्त्रागारामध्ये भदरगे यांच्यासह दोन जवानांची नेमणूक करण्यात आलेली होती. भदरगे यांच्यासोबत ड्युटीवर असलेले एक जवान शास्त्रागाराच्या बाहेर असतानाच अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला होता. आत शस्त्रागारात जाऊन पाहिले असता, भदरगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.