एसटीची वारी लाल परीची, पन्नास शहरांत एसटीचा माहिती रथ फिरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एसटीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खास तयार केलेला एसटीचा माहिती रथ 50 दिवस 50 शहरांमध्ये एसटीच्या विविध योजनांची माहिती देत फिरणार आहे. एसटीच्या या प्रचाररथाच्या माध्यमातून ‘बस फॉर अस फाऊंडेशन’चे स्वयंसेवक राज्यात फिरणार आहेत.

दापोडी येथे एसटीचा हा अनोखा चित्ररथ तयार करण्यात आला असून येत्या 10 जून रोजी बोरिवली एसटी स्थानकामधून 10 जूनला या लाल परीच्या वारीला सुरुवात होणार आहे. 10 ते 15 जूनदरम्यान मुंबईसह ठाणे, पनवेल, वसई, कल्याण, पालघर आणि अलिबाग एसटी बसस्थानकात प्रदर्शन भरणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवाशांना पाहता येणार आहे. परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गेल्या पाच वर्षांत घेतलेले निर्णय या चित्ररथात मांडण्यात येणार आहेत. त्याल लाल डब्यापासून ते शिवशाही, विठाई बसची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सांगितला जाणार आहे. त्यात नव्या बसस्थानकांचे आणि आधुनिकीकरण, सर्वसामान्यांची वातानुकूलित शिवशाही, प्रवासी आणि कर्मचार्‍यांसाठीचा अपघात सहाय्यता निधी अशा महामंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.