
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) ने 2025 साठी अनेक मोठ्या भरतींचे वेळापत्रक सुधारित केले आहे. यामध्ये सीएचएसएल, दिल्ली पोलीस आणि सीएपीएफ भरतीचा समावेश आहे. आयोगाने परीक्षेच्या तारखा आणि ऑनलाइन दुरुस्ती विंडोदेखील सुधारित केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, एसएससी सीएचएसएल टियर-1 परीक्षा आता देशभरातील परीक्षा केंद्रांवर सीबीटी मोडमध्ये 12 नोव्हेंबरपासून घेतली जाईल. शिवाय दिल्ली पोलीस भरतीसाठी अर्ज आणि दुरुस्ती विंडो आता 31 ऑक्टोबरऐवजी 2 नोव्हेंबर रोजी बंद होईल.



























































