ठाणे स्थानकात महिलांची प्रचंड चेंगराचेंगरी, रेटारेटी, हाणामाऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

ऐन पिकअवर्सला लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे ठाणे स्थानकात एल्फिस्टनसारखी दुर्घटना घडण्याची परिस्थिती सोमवारी निर्माण झाली. येणारी लोकल तुडुंब गर्दीने भरून येत असल्याने प्रचंड रेटारेटी, हाणामारीचा सामना यावेळी महिला प्रवाशांना करावा लागला. काही क्षणासाठी ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की चेंगराचेंगरीही झाली. सुदैवाने पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे जीवितहानी थोडक्यात टळली.

सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मध्य रेल्वेचे तीनतेरा वाजले होते. कल्याणकडून सीएसएमटीकडे येणाऱया लोकल ठाणे स्थानकात तुडुंब गर्दीने भरून येत होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सीएसएमटी लोकल येताच लेडीज डब्यासाठी उभ्या महिलांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. लोकलमधून उतरणाऱ्या व आतमध्ये शिरणाऱया महिलांमध्ये हाणामारी व चेंगराचेंगरी सुरू झाली. मात्र लोहमार्ग पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.