स्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू

35

सामना ऑनलाईन । दुबई

हिंदुस्थानी वंशाचे स्टँडअप कॉमेडियन मंजुनाथ नायडू (36) यांचा शुक्रवारी दुबई येथे स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. परफॉर्म करत असताना मंजूनाथ खूपच उत्साहित होते. प्रेक्षकही खळाळून हसत त्यांना दाद देत होते. त्याच वेळी अचानक ते खाली कोसळले. हादेखील त्यांच्या परफॉर्मन्सचा भाग असावा असे काटल्याने प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. पण बराच वेळ झाला तरी मंजुनाथ उठलेच नाहीत. पडले त्याचवेळी त्यांचा मृत्यू झालेला होता.

‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मंजुनाथ यांचा शुक्रवारी दुबईच्या ‘अल बरशा’ हॉटेलमध्ये कॉमेडी शो होता. स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंजुनाथ यांचा शो पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. शो हाऊसफुल्ल होता. ठरेलल्या वेळी शो सुरू झाला. दोन तासांचा हा शो संपण्यासाठी शेवटची काहीच मिनिटे बाकी असताना मंजुनाथ यांच्या वडील व कुटुंब यांच्यात घडणाऱ्या विनोदावर प्रेक्षकही हसून दाद होते. सगळे व्यवस्थित सुरू होते. त्याचवेळी अचानक हसता हसता मंजुनाथ बाजूच्या एका खुर्चीवर बसले आणि खाली पडले. तोदेखील परफॉर्मन्सचा भाग असावा असे वाटल्याने प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले. पण बराच वेळ झाला तरी मंजुनाथ उठलेच नाहीत. यामुळे आयोजक व पडद्यामागचे सहकारी स्टेजवर धावले तेव्हा मंजुनाथ निपचित पडल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर डॉक्टरांना तातडीने बोलवण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या