होम लोन घेताय? स्टेट बँकची ही योजना आवर्जून वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही घर घेण्यासाठी होमलोन घेणार आहात? मग एसबीआयने तुमच्यासाठी खास योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला स्वस्तात होम लोन मिळणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जधारकांची प्रोसेसिंग फी माफ केली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. कुठलेही गृह कर्ज घेतना ग्राहकांना एकूण कर्जाच्या रकमेपैकी काही टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून द्यावी लागते. एसबीआय मध्ये एकूण कर्जाच्या 0.25 टक्के प्रोसेसिंग फी आकारली जाते. ग्राहकांनी ही फी द्यावी लागणार नाही. इतकेच नाही तर एसबीआयने वार्षिक 6.90 टक्के गृहकर्ज देत आहे. इतर बँकेत हे प्रमाण 8 ते 9 टक्के आहे.

एसबीआयआयची ऑफर

  • स्टेट बँकेने 30 लाख रुपयांच्या गृहकर्जाला वार्षिक 6.90 टक्के व्याज दर लागू केले आहे. सध्याच्या घडीला हे सर्वात कमी व्याज दर आहे.
  • एसबीआय फेस्टिव्ह सीजनमध्ये 0.25 टक्के व्याज सूट दिली आहे.
  • या योजने अंतर्गत बँकेने प्रोसेसिंग फी माफ केली आहे.
  • इतकेच नाही तर एसबीआयचे मोबाईल ऍप योनोच्या माध्यमातून गृहकर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला अजून विशेष सूट मिळेल.