तळीरामांसाठी खुषखबर, 31 डिसेंबरला पहाटे पाच पर्यंत सुरू राहणार बार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या तळीरामांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने खुषखबर दिली आहे. नाताळ व 31 डिसेंबरच्या रात्री मद्यविक्री रात्री 1 पर्यंत तर बार पहाटे पाच पर्यंत सुरू ठेवण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे.

नाताळ निमित्त 24 आणि 25 डिसेंबरला तसेच 31 डिसेंबरला मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर बार खुले ठेवण्याची वेळ रात्री बारावरून पहाटे पाच करण्यात आली आहे.