शरद पवारांना जबरदस्त धक्का, बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागात वळवले

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सरकारने जबरदस्त धक्का दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात कायद्यात बदल करून दुष्काळी भागाच्या वाट्याचे बारामतीकडे वळविण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीनुसार बारामतीचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाकडे वळविण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढामधून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह निंबाळकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना दाद देताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नीरा देवधरचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला वळवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी खासदार नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत बारामतीकडे जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे सोडण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या