जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्ला विद्यापीठाचा दर्जा, उदय सामंत यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टसला विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य सरकारने सुरू केली आहे. पुढील अधिवेशनात यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शित्रण मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या संदर्भातील विधेयक मांडले. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, हे विधेयक मांडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असून त्या सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीएस्सी ऑग्रिकल्चर हा अभ्यासक्रम मराठीत करण्यासंदर्भात युजीसीशी पत्रव्यवहार सुरु करण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आली. महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असून गोरगरीब शेतकऱयांची मुले ही मराठीतून आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. त्यामुळे यासंदर्भात युजीसीशी पत्रव्यवहार करून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली असून त्यालाही उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.