विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मंगळवारी राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.

या अधिवेशनात विधानपरिषदेचे कामकाज एकूण 6 तास 30 मिनिटे झाले. त्यापैकी सरासरी कामकाजाचा कालावधी 3 तास, 15 मिनिटे एवढा होता. या कालावधीत विधानपरिषदेत 9 विधेयके संमत झाल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. विधानसभेचे प्रत्यक्षात कामकाज 10 तास 10 मिनिटे झाले. त्यापैकी सरासरी कामकाजाचा कालावधी 5 तास, 10 मिनिटे एवढा होता. या कालावधीत विधानसभेत 9 विधेयके संमत झाल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली.