लॉकडाऊनमुळे चंद्रपुर एसटीला नऊ कोटींचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
st bus
फाईल फोटो

देशात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे देशातील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचा फटका चंद्रपूरच्या एसटी महामंडळाला बसला असून 9 कोटींचे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या एसटी महामंडळा दिवसाची आवक 30 लाख इतकी आहे. सध्या लॉकडाऊन जारी केल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली असल्याने 9 कोटींचे नुकसान झाले आहे. 25 मार्च पासून बस डेपोमध्ये उभ्याच आहेत. एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर गाड्यांच्या देखभालीचाही खर्च वाढणार आहे. त्यामुळे तोटा अधिक वाढण्याची शक्यता आहे.