
आगामी काळात सीमालढय़ाला बळ देण्यासाठी युवासेना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिशी उभी राहील, असे आश्वासन युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी दिले. कोल्हापूर येथे प्रचारसभेला जाण्यासाठी ते बेळगावच्या सांबरा विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, दिलीप वैलूरकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, प्रवीण तेजम, सचिन गोरले, प्रकाश राऊत, किरण मोदगेकर, जोतिबा पाटील, अभिजित मजूकर, सिद्धार्थ चौगुले आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. निपाणी येथेही युवासेना सीमाभागाकडून वरुण सरदेसाई यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या दौऱयात रुपेश तोडकर, राधेश शहापूरकर, विनायक हुलजी, महेंद्र खोत तसेच युवासैनिक सहभागी झाले होते.





























































