
शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या मोठी घसरणीनंतर बुधवारी जबरदस्त तेजी दिसून येत आहे. आयटीपासून फार्मा सेक्टर तेजीत आहेत. तर सार्वजनिक क्षेत्रातील शेअर रॉकेट बनले आहेत. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये 638 अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये 250 अंकांची वाढ झाली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या तासातच ४ लाख कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२० अंकांनी वाढून ८५,३०० च्या वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 250 अंकांनी वाढून 25,842 वर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही ६3८ अंकांपेक्षा जास्त वाढ दिसून येत आहे. बाजार आता त्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ आहे. जागतिक बाजारपेठेतील सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाल्यामुळे ही तेजी आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे. अमेरिका आणि आशियाई बाजारपेठांमध्ये मजबूत तेजीचे हे एक प्रमुख कारण आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील सर्व क्षेत्रे ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत.
बीएसईवरील टॉप ३० समभागांपैकी आज फक्त एअरटेलचे शेअर्स २% ने घसरले; इतर सर्व समभाग ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्स, ट्रेंट, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर्स २% पर्यंत वाढले. २५ नोव्हेंबर रोजी बीएसई बाजार भांडवल ₹४६९.४१ लाख कोटी होते, जे आज ₹४७३.६५ लाख कोटी झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे मूल्यांकन आज ₹४.२४ लाख कोटींनी वाढले आहे.




























































