एचसीजी कॅन्सर सेंटरच्या वतीने स्टॉमा केअर क्लिनिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्करुग्णांमध्ये तसेच काही कर्करोग नसलेल्या रुग्णांमध्येही शस्त्रक्रिया करून स्टॉमा हे एक कृत्रिम द्वार तयार करता येते. ज्या आजारांमध्ये गुदाशय किंका मूत्राशय कायमस्वरुपी काढून टाकण्यात येते आणि पोटाच्या पटलाला मल किंवा मूत्रासाठी एक द्वार तयार करण्यात येते, अशा रुग्णांसाठी एचसीजी कॅन्सर सेंटर बोरिवलीच्या कोलोप्लास्ट ऍकेडमीच्या सहयोगाने ओस्टोमी शस्त्रक्रिया झालेल्या कर्करुग्णांसाठी स्टॉमा केअर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या   क्लिनिकमध्ये सर्वसमावेशक उपचार, अधिक चांगली आरोग्यसेवा देण्यात येणार असून स्टॉमा रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.