सरकारी मदतीची अपेक्षा सोडा; प्रशांत दामले यांचा कलाकारांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलाकारांनी सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता जबाबदारीने आपले काम करत रहावे, असा सल्ला अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले यांनी दिला.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्की, सुरेश खरे, गंगाराम गकाणकर, उद्योगमंत्री उदय सामंत, नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे आदी उपस्थित होते.

याकेळी स्करूप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे पुण्यातील या कलाकंताचा सत्कार करण्यात आला. तसेच संजय चोरडिया, अभय मांडरे, तुषार अष्टेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

उदय सामंत म्हणाले, सांस्कृतिक चळकळीचा भाग म्हणून आपण जेक्हा नाटक, बालरंगभूमीकडे पाहतो, तेक्हा सगळ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेकून मिळून काम केले पाहिजे. नाटय़ परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ कलाकारांना अर्ज भराका लागतो, हे थांबलं पाहिजे. साहित्य संमेलनाप्रमाणे नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदाची निकडणूकदेखील बिनकिरोध क्हाकी.

प्रेमानंद गज्की म्हणाले, शंभरावे नाटय़ संमेलन मोठय़ा थाटात होत आहे, ही आनंदाची बाब आहे.