कोळसा खाणीत घुसलेल्या अस्वलाला कुत्र्यांनी पिटाळले : पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर 

चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणीत कोळसा हाताळणी केंद्रात आलेल्या मोठ्या अस्वलाला कुत्र्यांनी पिटाळून लावले. हे अस्वल या परिसरात येताच इथं कुत्र्यांनी सामूहिक हल्ला चढवला. या कुत्र्यांचा सामना करणे अस्वलाला अशक्य झाले आणि शेवटी त्याने पळ काढला. हे दृश्य कॅमेराबद्ध झालं असून चांगलंच व्हायरल होत आहे. कोळसा खाणीला लागूनच जंगल असल्याने वन्यजीवांचा इथे नेहमी वावर असतो.