
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याचा नुसता संदेश न देता सक्रिय काम करण्याच्या उद्देशाने नांदेडच्या मिडटाऊन लायन्स क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण येथील गुजराती हायस्कूलमध्ये देण्यात आले. गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण शहरातील 16 शाळांमधील 211१ विद्यार्थ्यांना देण्यात आले. पल्लवी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना 450 किलो शाडू माती देण्यात आली.
या मातीपासून आकर्षक, मनमोहक आणि सुबक मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मूर्ती प्रत्येकाने आपल्या नेवून त्यांची प्रतिष्ठापणा करावी, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास लायन्स क्लब मिडटाऊनचे ज्येष्ठ सदस्य आर.के.पाटील, रमेश मिरजकर, किशोर पाटणी उपस्थित होते. त्यांनी मूर्तीचे परिक्षण करुन समाधान व्यक्त केले. या मूर्तीमधून समितीने सहा उत्कृष्ट मूर्तीची निवड केली व त्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक दायमा, लायन्स मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश जायस्वाल, अमृता जायस्वाल, सचिव अमृतसिंह चौहाण, सुनिता चौहाण, कोषाध्यक्ष संजय लाठकर, संगीता लाठकर यांचा सत्कार करण्यात आला.






























































