भाजपच्या आयटीसेलकडून माझ्यावर वैयक्तिक हल्ले, खासदार सुब्रमण्यम स्वामी चिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप आयटी सेलकडून अनेक खोट्या अकाऊंटवर वैयक्तिक हल्ले होत आहेत असा अरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसेच यावर माझ्या फॉलोअर्सने उत्तर दिले त्याला मी जबाबदार नाही असेही स्वामी म्हणाले आहेत.


स्वामी यांनी ट्विट करून म्हटले आहे की भाजपची आयटीसेल बेकार झाली आहे. सेलचे काही लोक खोटे अकाऊंट बनवून माझ्यावर हल्ले करत आहेत. पण जर माझ्या फॉलोअर्सनी त्यांना उत्तर दिले तर त्याला मी जवाबदार नाही असे स्वामी म्हणाले आहेत.


खासदार स्वामी यांनी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवी यांच्यावर टीका केली आहे. स्वामी म्हणाले की मालवीयकडे मी दुर्लक्ष करत आहे. पण भाजपने अशा लोकांना काढून टाकले पाहिजे. अमीत मालवीय हा घाणेरडा माणूस आहे. आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाला मानणारे असून आमी त्यांच्या नावाने पक्ष चालवतो रावणाच्या दुशासनाने प्रमाणे नाही असेही स्वामी म्हणाले.