मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाबासकी द्यायलाच हवी, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून कौतुकाची थाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावावर तातडीने नियंत्रण मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली आहे. हाच ट्रेंड जर कायम राहिला तर ही मोठी शाबासकी ठरेल, असेही स्वामी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

समाजमाध्यम ट्विटरवर नेहमी सक्रिय असलेले आणि सडतोड प्रतिक्रियेबद्दल प्रसिद्ध असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये, ‘मुंबईतील कोरोना प्रादूर्भाव रोखल्याने उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी द्यायलाच हवी, (हाच ट्रेंड पुढे कायम राहिला तर ही मोठी शाबासकी ठरेल), मला वाटतं आता हॉस्पिटलची परिस्थितीही उत्तम आहे’, असे लिहिले आहे.