कोरोना रुग्णांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अचानक वाढतेय; केईएमचे पथक करतेय अभ्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये तर मधुमेह नसतानाही साखरेचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोना शरीराच्या कोणकोणत्या भागांवर परिणाम करतोय, याबाबत डॉक्टरही हैराण झाले आहेत. याकर केईएमचे डॉक्टर अभ्यास करीत आहेत.

25 ते 55 वयोगटातील कोरोना रुग्णांना मधुमेह नसतानाही त्यांची शुगर लेव्हल प्रचंड प्रमाणात वाढत असल्याची माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. गेल्या महिन्यात एका 35 वर्षीय रुग्णाला ऍडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्याची शुगर लेव्हल 330 मिलिग्रॅम होती. या रुग्णाला कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण 500 मिलिग्रॅमवर पोहोचले. त्याने रोज दहा दिवस 150 ते 200 युनिट्स इन्श्युलिन घेतल्यानंतर त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात आल्याचे एका डॉक्टरने सांगितले.