इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । अलिबाग

इंजिनीयर शिक्षण घेताना सतत नापास होण्याच्या नैराश्यातून एका तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सलील पाटील (20) वर्षे असे तरुणाचे नाव आहे. अलिबाग शहरातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. सलील याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

सलील पाटील हा पुणे येथे इंजिनीयरचे शिक्षण घेत होता. मात्र गेली दोन वर्षे तो सतत नापास होत होता, त्यामुळे तो नैराश्यात होता. दोन दिवसांपूर्वी सलील हा अलिबाग येथे आपल्या घरी आला होता. सोमवारी सलीलचे आईवडील मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी सलील याने आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘मला माफ करा, मी सतत नापास होत असल्याने माझे जीवन संपवीत आहे’ अशी इंग्रजीमध्ये सुसाईड नोट लिहिली होती.