नाशिकच्या निफाडमध्ये सुखोई विमान कोसळलं, पायलट सुखरूप

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे मंगळवारी दुपारी हवाई दलाचे सुखोई-30 विमान कोसळल्याचे वृत्त आहे. एका द्रांक्ष्याच्या मळ्यात हे विमान कोसळले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमान कोसळत असल्याचे कळताच दोन्ही पायलटने पॅराशूटच्या मदतीने बाहेर उडी घेतली. त्यामुळे पायलटचा जीव वाचवा, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुखोई-30 या लढाऊ विमानाने पुण्यातील हवाई अड्ड्यावरून उड्डाण केले होते. मात्र निफाड तालुक्यातील शिरसगावमधील कोकणगाव येथे दांक्ष्याच्या बागेमध्ये विमान कोसळले. याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.