सुल्तान अझलान शाह हॉकी स्पर्धा,हिंदुस्थानने पोलंडचा 9-0 ने उडवला धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, इपोह

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने शुक्रवारी पोलंडचा 10-0 अशा फरकाने धुव्वा उडवत गुणतालिकेत 13 गुणांनिशी पहिल्या स्थानावर झेप घेतली. आता उद्या होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानी संघासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे. यावेळी दोन्ही संघ 2010 सालानंतर ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. हिंदुस्थान व दक्षिण कोरिया यांनी 2010 साली संयुक्त विजेतेपदावर नाव कोरले होते.

हिंदुस्थानकडून वरुणकुमार व मनदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. वरुणकुमारने 18 व 25व्या मिनिटाला तर मनदीप सिंगने 50 व 51 व्या मिनिटाला गोल करीत प्रतिस्पर्ध्यांचा बचाव खिळखिळा केला. विवेक सागर प्रसाद, सुमीतकुमार, सुरेंदरकुमार, सिमरनजीत सिंग, निलकांता शर्मा आणि अमित रोहीदासने प्रत्येकी एक गोल केला.