राज्यातील शाळांना 1 मे ते 13 जूनदरम्यान उन्हाळी सुट्टी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. 1 मेपासून ते 13 जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना या काळात सुची राहणार आहे. तर 14 जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होणार आहेत.

विदर्भातील जून महिन्याचे तापमान लक्षात घेता तेथे 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करत शाळा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.