
मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बरवर सकाळी 11.10 ते 4.10 या वेळेत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेवर भायखळा ते माटुंगा अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12.35 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथे जाणाऱया मेल- एक्प्रेस गाडय़ा माटुंगा ते भायखळादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मार्गावर लोकल भायखळा ते माटुंगादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोनदा थांबा देण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे.



























































