मराठी शिकायचे आहे – सुनील शेट्टी

‘मला मराठी शिकायचे आहे आणि मराठी बोलायचे आहे. मराठी माणसांसारखे बोलायचे आहे,’ अशी इच्छा आज अभिनेता सुनील शेट्टी याने बोलून दाखवली. ‘मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. कर्मभूमीत राहून मला मराठी येत नसेल तर मला त्याचे वाईट वाटले पाहिजे. मला मराठी यायलाच हवे, असे तो म्हणाला. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता.