‘द कपिल शर्मा शो’मध्ये सनी झाला भावुक

3033

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये शनिवारी बॉलीवूडमधील लोकप्रिय देओल कुटुंब भेटीला येणार आहे. करण देओल ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत. करणसह त्याचे वडील सनी देओल आणि आजोबा धर्मेंद्र आता कपिलच्या शोमध्ये येणार आहेत. कपिलने करणला विचारले, सनी देओलचा मुलगा असल्याने तुझे बालपण किती सुखद किंवा क्लेशकारक होते. त्यावर करण म्हणतो, ते माझ्या फायद्यासाठी नव्हते. मला शिक्षकांनी सांगितले होते की, तू एकाच गोष्टीसाठी कामाचा आहेस. फक्त वडिलांच्या चेकवर सह्या करण्यासाठी. याशिवाय जीवनात तू कुठेही पोचणार नाहीस. लोकांना वाटते की, तुम्ही अभिनेत्याची मुले असलात की उद्दाम असता, पण मी खूप बुजरा आणि अंतर्मुख होतो. हे उत्तर ऐकून सनी देओल काहीसा भावुक झालेला शोमध्ये बघायला मिळतो. ‘द कपिल शर्मा शो’ दर शनिवार- रविवारी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीवर बघता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या