सेटवर कान खाजवल्यानं सनी दचकली, कास्टिंग डिरेक्टरला दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) बेबी डॉल नावानं ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट करत असते. फोटो-व्हिडीओ, सेटवरची धमाल, अशा पोस्ट पडल्या रे पडल्या की चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट सुरू झाल्याच पाहिजेत. आपल्या मादक अदांसाठी सनी प्रसिद्ध आहे. सध्या तिनं इन्स्टाग्रावर पोस्ट केलेला व्हिडीओ चांगलाच गाजतो.

sunny-leone-bathtub

सनीने सेटवर असतानाचा एक गमतीदार व्हिडीओ शेअर केला आहे. एका शॉटसाठी तयार होतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत तिचा कास्टिंग डिरेक्टर सनी राजनी दिसतो आहे. सनी शॉटसाठी एकदम तयार असतानाच अचानक मागून सनी राजनी येतो आणि तिच्या कानात काडी टाकून गुदगुली करतो. त्यामुळे सनी एकदम दचकते आणि ओरडते.


View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत असून चाहतेही पोटधरून हसत आहेत. सनीनं तर सनी राजनीला इशाराच दिला आहे. ‘ याची किंमत मोजावी लागेल, वाट पहा!’ असं तिनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

सनीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिनं एक मल्टीकलर ड्रेस परिधान केला आहे आणि केसांचा अंबाडा घातला आहे. सनीची मेकअप आर्टिस्ट तिथं तिच्या मागे उभी आहे. हा प्रकार घडल्याने सनी चांगलीच दचकते.

सनीच्या पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. या व्हिडीओला 3000 हून अधिक कमेंट आल्या आहेत.

sunny-leone

sunny leone getting ready for the shot one person tickled in her ear