बिहारमध्ये वगळलेले 65 लाख मतदार कोण? सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागवले स्पष्टीकरण

‘मतदार फेरपडताळणी प्रक्रियेत बिहारमधील मतदार यादीतून वगळलेले 65 लाख मतदार नेमके कोण आहेत, याची सविस्तर माहिती 12 ऑगस्टला द्या,’ असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. नियमानुसार, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना याची माहिती द्यायला हवी, असे न्या. सूर्य कांत यांनी यावेळी नमूद केले.