जा परत शिकून या! डार्विन आणि आईनस्टाईनच्या सिद्धांताना आव्हान देणारी याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आणि आईनस्टाईन यांनी मांडलेला सापेक्षतेचा सिद्धांत या दोन्ही सिद्धांताना आव्हान देणाऱ्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली आहे. राम कुमार नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सानवणी झाली होती. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आणि आईनस्टाईन यांनी मांडलेला सापेक्षतेचा सिद्धांत हे दोन्ही सिद्धांत चुकीचे असून त्यामुळे असंख्य माणसांचे नुकसान झाले आहे. हे सिद्धांत शाळांमधून शिकवण्यात येऊ नयेत अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली होती. यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला पुन्हा शिकण्यास किंवा स्वत:चा वेगळा सिद्धांत निर्माण करण्याचा सल्ला देत याचिका फेटाळून लावली. विज्ञानाच्या कसोटीवर आधारीत हे सिद्धांत लोकांच्या ज्ञानातून काढून टाकता येऊ शकत नाहीत असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.