गुलाम नबी आझाद जम्मू कश्मीरला जाणार, सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

493

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना सर्वोच्च न्यायालयाने जम्मू कश्मीरला भेट देण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान त्यांना तेथे कोणत्याही प्रकारचे भाषण, सभा, रॅली आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जम्मू कश्मीरमधील जनतेशी संवाद साधून तेथील परिस्थितीचा अहवाल न्यायालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 लागू केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी दोनदा जम्मू कश्मीरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना श्रीनगर विमानतळावरूनच परत दिल्लीला पाठविण्यात आले. त्यामुळे आझाद यांनी त्यांना त्यांचे कुटुंब राहत असलेल्या राज्यात जाण्यापासून रोखण्यात येत असल्याच्या विरोधात रविवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांना जम्मू कश्मीरला भेट देण्याची परवानगी दिली आहे. जम्मू कश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग आणि जम्मू या जिल्ह्यांना ते भेट देऊ शकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या