मोदी सरकारची वृत्ती ‘ह्युब्रस’ -सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चेदरम्यान मोदी सरकारला ‘ह्युब्रस’ अर्थात धोकादायक अतिआत्मविश्वास बाळगणाऱया अहंमन्य व्यक्तिमत्त्वाची उपमा देत सरकारचे वाभाडे काढले. ‘आम्ही तर येणारच आहोत. तुम्ही संपणार आहात. विरोधक जिंकणारच नाहीत वगैरे…’ बोलणाऱया या सरकारच्या वृत्तीसाठी हाच शब्द लागू पडतो असं वाटतं’, असे त्या म्हणाल्या.

या सरकारला नवरत्न वगैरे बोलण्याची हौस आहे, पण गेल्या 9 वर्षांत या सरकारने 9 सरकारं पाडली आहेत. भाजपने पाडलेली राज्य सरकारं, महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर, सरकारी संस्थांचं पतन, हिंदुस्थानचं जागतिक स्तरावर घसरलेलं मानांकन आणि कायदा-व्यवस्थेचा मुद्दा… हीच यांची नवरत्नं आहेत, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.