
अकोल्यात एका गावगुंडाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केले आहेत. आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटके दिले, तिचे मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर तिला सर्वांदेखत विवस्त्र करण्याचाही प्रयत्न केला. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार…
— Supriya Sule (@supriya_sule) November 20, 2023
आरोपीला अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अकोल्यातील खदान पोलिसांनी अटक केली आहे. गणेश कुमरे उर्फ गणीभाई असे अटक करण्यात आलेल्या गावगुंडाचे नाव आहे. त्याच्यावर आयपीसीच्या विविध कलमान्वये आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.