सुप्रिया सुळेंचा एक लाखाच्या मताधिक्यांनी पराभव होईल- संजय काकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मताधिक्याने पराभव होईल असे सांगतानाच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख खासदार संजय काकडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणकीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे असे सांगून काकडे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या उमेदवारासाठी अनुकूल वाताकरण आहे. बारामती वगळता इतर खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळेल आणि किमान एक लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल.

काकडे-बापट दिलजमाई
पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांच्यात अखेर दिलजमाई झाली. बापट हे काकडे यांच्या घरी पोहचले आणि साधारण तीन वर्षांच्या सुप्त संघर्षाची अखेर झाली. गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत. इच्छुक अनेकजण असतात मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचे काम करायचे असते. हा प्रोटोकॉल असतो असे काकडे यांनी सांगितले.