
सामना प्रतिनिधी । मुंबई
पाणी फाऊंडेशनच्या कॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गाकाने बाजी मारली आहे. 75 लाख रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्करूप आहे. कॉटर कप स्पर्धा 2019 चे तालुका व राज्यस्तरिय पारितोषिकांचे वितरण रविवारी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाले.
दुष्काळाला आपण अजून हरवलेले नाही. पाणलोट कामासोबतच माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावे लागेल. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू, असे प्रतिपादन अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खानने यावेळी केले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे सचिन मर्डीकर, एच. टी. पारेख फाऊंडेशनच्या झिया लाल, पिरामल फाऊंडेशनचे आर. चंद्रशेखर, टाटा ट्रस्टचे पवित्रकुमार आणि बजाज फाऊंडेशनचे अरविंद जोशी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत दुसरा क्रमांक पिंपरी जलसेन (ता. पारनेर) आणि शिंदी र्ख्दु (ता. माण) यांनी पटकावला. तर जळगावमधील आनोरे (ता. अमळनेर), काशिममधील बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळ पीर) आणि बीडच्या देवर्याची काडी या गावांना तिसरे पारितोषिक मिळाले.




























































