रैना, पंतचा सराव सुरू

354

कोरोना संकटामधून बाहेर येत क्रीडाविश्व स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदुस्थानात आता क्रिकेटपटूंची पावलेही सरावाच्या दिशेने पडू लागली आहेत. चेतेश्वर पुजारा, उमेश यादव व इशांत शर्मा या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी नेटमध्ये सराव करायला सुरुवात केल्यानंतर आता सुरेश रैना व रिषभ पंत यांनीही नेटमध्ये हात आजमावले आहेत. सुरेश रैना आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 साली खेळला. त्यानंतर त्याच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे संघाबाहेरच ठेवण्यात आले. मात्र मंगळवारी त्याने सोशल साईटवर नेटमध्ये फलंदाजी करीत असलेला फोटो प्रसिद्ध केला. या फोटोला कॅप्शन देताना त्याने म्हटले की, मेहनतीला पर्याय नाही. कोणत्याही परिस्थितीत गुडघे टेकणार नाही. याचे फळ आपोआपच मिळेल. दरम्यान, रिषभ पंत यानेही फलंदाजीच्या सरावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या