सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण – अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त, मृत्यूचे कारण झाले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. पोलिसांनी सुरुवातीच्या कारवाईत यास आत्महत्या प्रकरण म्हटले होते. तसेच सुरुवातीच्या शवविच्छेदन अहवालात सुशांत याचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे म्हटले होते. आता पोलिसांना अंतिम शवविच्छेदन अहवालही मिळाला असून यात अनेक बारीक-सारीक गोष्टींचा खुलासा झाला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंतिम शवविच्छेदन अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूत याने फाशी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गळफास घेतल्याने सुशांत याचा श्वास कोंडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. याआधी देखील शवविच्छेदन करण्यात आले होते, यावर तीन डॉक्टरांनी सह्या केल्या होत्या. आताचा अंतिम अहवाल 5 डॉक्टरांनी साइन केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांवर सलमानने अखेर मौन सोडले, म्हणाला…

श्वास कोंडल्याने मृत्यू
सुशांत याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळून आल्या नाही. तसेच त्याच्या नखातही काही आढळून आले नाही. अंतिम शवविच्छेदन अहवालात सुशांत याचा मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सुशांत माझ्या स्वप्नात आला, म्हणाला तुझ्या पोटी पुनर्जन्म घेणार; राखी सावंतचा दावा

दिशाच्या मृत्यूशी संबंध नाही
सुशांत याच्या आत्महत्येपूर्वी पाच दिवस आधी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिनेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांत याच्या आत्महत्येचे त्या प्रकरणाशी काही कनेक्शन असावे अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्या प्रकरणाचा सुशांत याच्या आत्महत्येशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

23 लोकांची चौकशी
मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत या प्रकरणी 23 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. त्याच्या सीएचा जबाबही नोंदवण्यात आला असून रिया चक्रवर्ती, बिजनेस मॅनेजर, पीआर मॅनेजर, कुशाल जावेरी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.