
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या सीबीआय तपास करीत आहेत. तर ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने देखील कारवाईचा वेग वाढविला आहे. त्यातच सुशांतची बहीण सुशांतला बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला ड्रग्ज देत असल्याची खळबळजक माहिती उजेडात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ही माहिती आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना आज दिली. याप्रकरणी सुशांतची बहीण, काही नातेवाईक आणि डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून या सर्वांची माहिती आपण सीबीआकडे दिली आहे. सीबीआय याप्रकरणी योग्य तो तपास करेल, असा विश्वास परमबीर सिंग यांनी यावेळी बोलून दाखविला. सुशांतला हे ड्रग्ज देण्यासाठी सुशांतच्या बहिणीने दिल्लीतील डॉक्टर तसेच सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शन आणि रेकॉर्ड तयार केल्याचे देखील त्यांनी यावेळी उजेडात आणले.
























































