
जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न दर हा गेल्या पाच वर्षात सर्वात खालच्या स्तरावर आला आहे. हा दर सध्या 6.8 टक्के इतका असून या आकड्यांमुळे देशात आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. देशाचे माजी पंतप्रधान ज्यांना सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणूनही ओळखतो त्या मनमोहन सिंग यांनीही आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मात्र भाजपच्या एका मंत्र्याचे असे म्हणणे आहे की श्रावण भाद्रपदात दरवर्षी मंदी असते.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की बिहारमध्ये मंदीचा काहीही परिणाम नाहीये त्यामुळे इथे वाहनांची विक्रीही कमी झालेली नाहीये. “तसं पाहायला गेलं तर दरवर्षी श्रावण-भाद्रपदात मंदी असतेच,मात्र यावेळी काही जण उगाच गोंगाट करून निवडणुकीतील पराभवाला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
केंद्र सरकार ने अर्थव्यवस्था में तेजी लाने के लिए 32 सूत्री राहत पैकेज की घोषणा और 10 छोटे बैंकों के विलय की पहल से लेंडिंग कैपिसिटी बढ़ाने जैसे जो चौतरफा उपाय किये हैं, उनका असर अगली तिमाही में महसूस किया जाएगा।
वैसे तो हर साल सावन-भादो में मंदी रहती है, लेकिन इस बार……. pic.twitter.com/6pu1xkqzWP
— Sushil Kumar Modi (@SushilModi) September 1, 2019
मोदी यांनी म्हटले आहे की आर्थिक मंदीपासून सुटका मिळवण्यासाठी केंद्र सरकारने 32 सूत्री पॅकेजची घोषणा केली आहे. 10 बँकांचे विलीनीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्जपुरवठा वाढायला मदत होईल आणि त्याचे पुढील तिमाहीमध्ये सकारात्मक परिणाम दिसायला लागलीत असंही मोदींनी म्हटले आहे.






























































