स्वाभिमानच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

ओरोस विभागात स्वाभिमान पक्षाला खिंडार पडले असून रमेश कदम, भूषण कदम, गोविंद कावले यांच्यासह पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून घेतले शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, ओरोस विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, उपविभाग प्रमुख हरी वायंगणकर, कृष्णा गावडे, अरुण राणे, मंगला ओरोसकर, मनस्वी परब, भगवन परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.