तेर्सेबांबर्डेत स्वाभिमान पक्षाला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाराप जिल्हा परिषद विभागातील तेर्सेबांबर्डे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रामराम करीत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

तेर्सेबांबर्डे काजराळवाडी येथे मंगळवारी रात्री हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जि.प.सदस्य राजू कविटकर, माजी जि.प.सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, झाराप विभाग प्रमुख बबन बोभाटे, झाराप सरपंच सौ. स्वाती तेंडोलकर, आकेरी शाखाप्रमुख महेश जामदार, तेर्सेबांबर्डे शाखाप्रमुख अमित बाणे, उपशाखाप्रमुख मंगेश परब, अमित साळगांवकर, माजी सरपंच सुधीर मेस्त्री, अशोक बांबर्डेकर, शंकर मांजरेकर, उदय बांबर्डेकर आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.