नारायणगाव येथे स्वच्छता अभियान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जायकवाडी

शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शन शिबिर व शिकवणी वर्ग सुरू करणार असून, त्याचा लाभ विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजसेवक डॉ. धोंडीभाऊ पुजारी यांनी नारायणगाव येथे स्वच्छता अभियानप्रसंगी केले.

समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक डॉ. धोंडीभाऊ पुजारी यांनी स्वखर्चातून नारायणगाव येथे स्वच्छता अभियान व पाणंद रस्ते कामास प्रारंभ केला. यावेळी सरपंच संजय गवळी, उपसरपंच अशोक रोडे, चेअरमन हरिभाऊ गवळी, ग्रा.पं.सदस्य आदिनाथ गवळी, गणेश दळे, योगेश रोडे, मनोज म्हस्के, राधाकिसन नवले, संजय म्हस्के, संदीप लबडे, चंद्रकांत बारे, राजू दिलवाले, ग्रामसेवक इंगोले आदींची उपस्थिती होती.