हे भाजपचे षडयंत्र, स्वाती मालिवालला मोहरा बनवलं; आतिषी यांचा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांचा खासगी सचिव विभव कुमारने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी काही दिवसांपूर्वी केला. मात्र स्वाती मालिवाल यांचे प्रकरण हे भाजपचे षडयंत्र असून ,स्वाती मालिवालला मोहरा बनवलं जातंय; असा आरोप दिल्लीतील आपच्या नेत्या आतिषी मार्लेना यांनी केला आहे.

जेव्हापासून अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे आणि ते तुरुंगातून सुटून बाहेर आले आहेत. तेव्हापासून भाजप घाबरली आहे. त्यामुळेच भाजपने हे षडयंत्र रचले आहे. या षडयंत्रातूनच त्यांनी स्वाती मालिवाल यांना 13 मे रोजी सकाळी लवकर केजरीवाल यांच्या निवासस्थानी पाठवले. त्यांना अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचे होते. स्वाती मालिवाल या षडयंत्राचा चेहरा आणि मोहरा आहे, असे आतिषी मार्लेना यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.