वॉर्नरचे तुफानी शतकाने पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। सिडनी

यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱया एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी डेव्हिड वॉर्नरची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली नाही. मात्र शस्त्रक्रियेनंतर वॉर्नरने तुफानी शतक ठोकून झोकात पुनरागमन करत आपण फिट असल्याचे दाखवून दिले. वॉर्नरच्या हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर या धडाकेबाज फलंदाजाने सिडनीतील आपल्या क्लबकडून खेळताना शतक ठोकून आपण फिट झाल्याचे दाखवून दिले. वॉर्नरने रेंडविक पीटर शॅमी संघाकडून खेळताना पेनरिथ क्लबविरुद्ध 77 चेंडूंत 110 धावांची खेळी करताना 4 चौकारांसह 7 षटकारांचा घणाघात केला. दक्षिण आफ्रिका दौऱयावर चेंडू कुरतडल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली होती. 28 मार्चला त्याची ही बंदीची शिक्षा संपणार आहे. वॉर्नरच्या शतकानंतरही त्याच्या संघाचा पराभव झाला.