जिहादच्या नावाखाली पाकिस्तान हिंसाचार पसरवतोय : अकबरुद्दीन

548

जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द करणे ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब आहे. कश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयांचा बाहेरच्या लोकांशी काहीही संबंध नाही. कोणत्याही देशाचा यात हस्तक्षेप हिंदुस्थान खपवून घेणार नाही, असे संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे स्थायी दूत सय्यद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले.

जिहादच्या नावाखाली पाकिस्तान हिंसाचार आणि दहशतवाद पसरवत असल्याकडेही अकबरुद्दीने यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. आम्ही आमच्या धोरणांवर आणि निर्णयांवर ठाम आहोत. कश्मीर ही आमची देशातंर्गत बाब असून तेथील समस्या चर्चेने सोडवण्यात येतील. हिंसाचार हे कोणत्याही समस्येवर उत्तर असू शकत नाही. पाकिस्तानने हिंसाचार पसरवणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे, असेही अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.

जम्मू कश्मीरच्या विकासासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होणार असून सुशासन आणि जनतेच्या विकासाला सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने कश्मीरी जनतेच्या हिताच्या आड येऊ नये आणि खोट्या बातम्या पसरवू नयेत, असेही अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू, कश्मीर आणि लडाखमधील जनतेचा सामाजिक, आर्थिक विकास होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या