बहुचर्चित तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘तांडव’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला. अभिषेक प्रोडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित या चित्रपट महिला सबलीकरणाचा मुद्दा प्रखरपणे मांडला आहे.

तांडव या चित्रपटामध्ये अरूण नलावडे, पूजा रायबागी, नील राजूरीकर, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, सुप्रिया गावकर आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तांडव या चित्रपटाची गोष्ट एका कर्तव्यनिष्ठ महिला पोलीसाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगणारी ही नायिका आहे. पूजा रायबागीने ही भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये तिचा संघर्ष सत्तेतील राजकारण्यांशी होतो. त्याचा ती कसा सामना करते यावर आधारीत चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष चिमाजी जाधव यांनी सत्य परिस्थिती फार उत्तम रित्या चित्रपटामध्ये मांडली आहे. तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. चित्रपटाची मूळ संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे. या सिनेमामध्ये नील राजूरीकरने मुख्य भूमिका साकारली आहे. तर सयाजी शिंदे यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. तांडव हा सिनेमा महिलांना प्रेरणादायी ठरेल असे बोलले जात आहे.